Breaking News

‘दंतेश्वरी लडाके’ करणार नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड ः वृत्तसंस्था

’दंतेश्वरी लडाके’ नामक पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहे. ‘काट्याने काटा काढणे’ या म्हणीप्रमाणे आता नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाच वापर केला जाणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारने ‘दंतेश्वरी लडाके’ नावाचे पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक तयार केले आहे. येथील नक्षलग्रस्त बस्तर आणि दंतेवाडा भागात हे पथक तैनात करण्यात आले आहे.

‘दंतेश्वरी लडाके’ पथकात 30 नक्षलविरोधी महिला कमांडो आहेत. यामध्ये 10 अशा महिला आहेत ज्यांनी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना या नक्षलविरोधी पथकात अधिकृतरित्या समावून घेण्यात आले आहे.

बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा म्हणाले की, ‘दंतेश्वरी लडाके’ पथक हे महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरण आहे. याद्वारे महिला पोलीस कमांडो आपल्या पुरुष सहकार्‍यांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्या उत्कृष्ट पद्धतीने काम करतील, असा मला विश्वास आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील नक्षलवादाविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. नुकतेच छत्तीसगड पोलिसांनी पहिल्यांदाच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डमध्येही महिला कमांडो तैनात केले आहेत. हे कमांडो नक्षलविरोधी कारवायांसाठीचे सर्वात पुढे असणारे पथक आहे. या पथकातही 30 महिलांचा समावेश असून पोलीस उपअधीक्षक दिनेश्वरी नाद यांच्या नेतृत्वाखाली ते तयार करण्यात आले आहे. दरम्यान, दंतेश्वरी फायटर्स आणि पोलीस अधिकारी या दोघांनाही जंगलातील युद्धासाठी व्यापक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply