Breaking News

मी, ते राज ठाकरे पाहिले….. आणि आज हे !!

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशात आणि मुंबई प्रांतावर कॉग्रेसच सरकार होत. मुंबई सह महाराष्ट्र आणि सौराष्ट्र अस हे मुंबई इलाक्याच नाव होत. मराठीची गळचेपी आणि संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन पेटल तेच मुळात त्यावेळच्या कॉग्रेस सत्तेच्या विरोधात. हे आंदोलन दडपण्याचा आणि ठेचुन काढण्याचा सर्वोतोपरी प्रतत्न मोरारजी देसाई आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले. या आंदोलनात कोण नेते पूढ होते ? कोण शहिद झाले ? महाराष्टाच्या निर्मितीत कॉग्रेसच योगदान काय ? स्वा. सावरकर, सेनापती बापट, कॉ डांगे, एस एम जोशी, सी.डी.देशमुख, अहिल्या राणडेकर, विमल रणदीवे, गोदावरी परुळेकर,  जॉर्ज फर्नांडीस, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य आत्रे, शाहिर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मांडखोलकर असे अनेक नेते, लेखक, पत्रकार या आंदोलनात उतरले होते. कॉग्रेसच पाणीपत करुन संयुक्त महाराष्ट्र समीतीने विधानभवनावर भगवा फडकवला. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली तेव्हा कोठे 1 मे 1960 साली मराठी भाषीक महाराष्ट्राची निर्मिती झाली.

मराठी भाषीक महाराष्ट्राची निर्मिती झाली मात्र तरीही मुंबई मधील मराठी भाषा आणि मराठी माणसाची गळचेपी काही थांबली नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली, जय महाराष्ट्र ! हा घोषणेचा मंत्र मराठी माणसाच्या नसानसात आणि मनामनात भिनला, आणि पुन्हा एकदा मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद झाला. बाळासाहेबांना अटक करण्याचा विडा छगन भुजबळ यांनी उचलला आणि अखंड महाराष्ट्रचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांना अटक केली ती याच कॉग्रेसच्या काळात….. याच शिवसेनाप्रमुखांचा विचारांचा वारसा घेवुन महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेची स्थापना केली, ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली. मराठी तरुन मनसेच्या झेंड्याखाली मोठ्या संख्येने एकत्र आला. मराठी भाषेसाठी आंदोलन उभी राहीली, भैया हटाव, खळखट्याक, मराठी पाट्या, टोलबंदी अशी अनेक आंदोलने उभी राहकली. राज ठाकरे यांच्या आदेशावर आगीतही उडी घेणारा कार्यकर्ता उभा राहीला. अनेकांवर गुन्हे दाखल झाले, अनेक जनांना तडीपारी झाल्या, अनेक कार्यकर्त्यांचे संसार उध्वस्त झाले…..याच कॉग्रेसच्या सरकारच्या काळात. राज ठाकरेंना भाषण बंदी घालण्यात आली….याच कॉग्रेसच्या काळात. राज ठाकरेंसह मनसे नेत्यांना अटक झाली, गंभीर गुन्हे दाखल झाले, भाषण बंदी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, कार्यकर्ते देशोधडीला लागले….याच कॉग्रेसच्या काळात. मी देखील एक कार्यकर्ता म्हणून या सर्व घटनांचा साक्षीदार होतो. माझ्यावरही गुन्हे दाखल झाले, मलाही अटक झाली…! परंतु एक वेगळाच अभिमान आणि स्वाभिमान होता, की मी जे केल ते माझ्या महाराष्ट्र आणि माझ्या मराठी भाषा आणि मराठी तरुण बांधवांसाठी. मात्र टोलच आंदोलन फसल. साहेब घरातुन बाहेर पडेनात. कार्यकर्ते दिशाहीन झाले. मनसेच जहाज वादळात भरकटु लागल. माझ्या सारख्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला कळेना काय कराव ? साहेब काही बोलत नाही, दिशा देत नाहीत, निवडणूका लढवित नाहीत. आता पुढे काय ? दिशाहीन झालेला कार्यकर्ता घरी बसला मात्र इतर कोणत्या पक्षाच्या दावनीला गेला नाही. आज ना उद्या साहेब दिशा देतील या भाबड्या आशेवर हा मनसेचा कार्यकर्ता वाट पाहु लागला…… आणि साहेब बाहेर पडले ते वेगळाच विचार घेवुन. तो मराठीचा स्वाभिमान आणि तो महाराष्ट्रचा विचार साहेबांनी कुरता बदलावा तसा बदलुन टाकला.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आंघोळ करतात ते पाणी चमचाभर तरी आपल्या महाराष्ट्रातल्या कॉग्रेसच्या नेत्यांना पाजले पाहिजे आशा भाषेत मोदिंच्या कार्याचे कौतुक करणारे राज ठाकरे, या लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा हटाव हा विचार घेवुनच बाहेर पडले. राज्यात प्रचंड मोठ्या सभा घेवुन मोदी शहा आणि भाजपा कशी वाईट आहे. भ्रष्टाचाराने देश पोखरलेली कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कशी चांगली आहे हे जनतेला पोदतिडकीतुन सांगु लागले. कार्यकर्त्याला प्रश्न पडला कॉग्रेसला चांगल म्हणायच कि विकासाची गंगा अवतरणार्‍या भाजपाला चुकीच समजाव ? मनसेचा कार्यकर्ता गोंधळून गेला. बाकी काही असो पंतप्रधान पुन्हा मोदीच होणार या अविभाषेत असलेला मनसेचा कार्यकर्ता संभ्रमात पडला. साहेबांच्या भाषणांचा प्रभाव एवढा झाला की हा कार्यकर्ता आता विचार करायचही बंद झाला. डोळ्यांवर त्याच्या राज ठाकरेंच्या भाषणांच्या विचारांची पट्टी बांधुन, ज्या कॉग्रेस आणि राष्ट्रवादिने राज ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे घातले, त्यांना तुरुंगात टाकले, तडीपार केले, त्याच कॉग्रेस आणि राष्ट्रवादिचा प्रचार मनसे कार्यकर्ते करु लागले. मोदींचा त्याग, देशाभिमान, दहशदवादाचा खात्मा, पाकिस्तानची जागतीक नाकाबंदी, भ्रष्टाचाराला घातलेला लगाम, तलाक बंदी, गोरक्षण, विकासाच वाढता उचांक हे त्यांना दिसेनासे झाले. भ्रष्टाचाराने राज्य आणि देश पोखरलेल्या या घुशींना मनसे पुजु लागली. का ? आणि कशा साठी ? माहित नाही पण साहेबांनी सांगितलय….! या मनसैनिकांना एकच विचारावेसे वाटत, साहेबांनी मोदींवर प्रखर आणि जहरी टीका केली, नको नको ते खोटे आरोप केले, मानहानी केली, पंतप्रधान या पदाचही ज्यांनी मुलाजमा ठेवला नाही त्या राज ठाकरेंच्या सभांवर आणि भाषणांवर भाजपा सरकारच्या काळात एकदाही बंदी घातली गेली नाही. भाजपाच्या काळात मनसेनेला एकही आंदोलनं कराव लागल नाही. राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर एकदाही कोणता गुन्हा भाजपा सरकारच्या काळात झाला नाही. उलट राज्यात भाजपाच सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सर्वप्रथम मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले. याचाही मीच साक्षिदार आहे. कारण या प्रक्रियेत माझ्यावरील गुन्हे देखील जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सुचने नुसार निकाली निघाले. तरीही राज ठाकरे भाजपाच्या विरोधात कॉग्रेसला मदत करा अस कस काय मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगु शकतात ?

पुर्वेकडील राज्यातील स्थानिकांनी घुसखोरी करणार्‍या मुस्लिमांवर केलेले हल्ले आणि त्या विरोधात कॉग्रेसच्या काळात मुंबईत मुस्लिमांचा निघालेल्या मोर्चात, परप्रांतीय मुस्लिम मोर्चेकरांनी संयुक्त महाराष्ट्र शहिदांचे स्मारक तोडले, महिला पोलिसांचा विनय भंग केला आणि या विरोधात राज ठाकरे यांनी भव्य मोर्चा काढला. उभा महाराष्ट्र या संतापजन घटनेनंतर राज साहेबांच्या मागे उभा राहीला. मात्र तात्कालीन कॉग्रेस सरकारणे उच्छाद घलणार्‍या आणि महिला पोलीसांचा विनयभंग करणार्‍या त्या मोर्चेकरांवर कारवाई न करता मनसैनिकांवर कारवाई केली. तरीही आज राज ठाकरे याच काँग्रेसला मदत करण्यासाठी का सांगत असावेत ? याच गणित काही लागत नाही. कोणती वजाबाकी अधवा बेरीज राज ठाकरे यांच्या या बदललेल्या पवित्र्या मागे आहे ? हे सर्वसामान्य मनसैनिकांना आजही कळलेले नाही. मात्र एवढ नक्की आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळी पासुन ते मराठी पाट्यांच्या आंदोनापर्यंत मराठी आणि महाराष्ट्राच्या गळ्याचा घोट घेणार्‍या काँग्रेस सोबत गेल्याने मनसेनेला मराठी आणि महाराष्ट्र विषयी बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही….!

जय महाराष्ट्र…….!

-महेश शिंदे

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply