Breaking News

हॉकीचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग म्हणाले, खेळातही पाकला हरवून दाखवा

कोलकाता : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानसोबत संबंध ठेवणे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे यावर विवाद सुरू आहेत. अनेक भारतीयांचे पाकिस्तानशी संबंध ठेऊ नये असे म्हणणे आहे. आपल्या देशाशी असलेले पाकिस्तानचे क्रीडा संबंधही तोडावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. हॉकी टीमचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळले पाहिजे आणि त्यांना हरवलेही पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

यंदा जून महिन्यात भुवनेश्वरमध्ये हॉकी सीरीजच्या फायनल स्पर्धा होणार आहेत. ही टोकिओ ऑलिम्पिक 2020 साठी क्वलिफाइंग स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘आपल्याकडे असणार्‍या आंतराष्ट्रीय प्रतिबद्धतेला पूर्ण केले पाहिजे. आपण पाकिस्तासोबत केवळ दोन संघात होणार्‍या सीरीज खेळणार नसून त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे’ त्यांनी सांगितले.

गुरबक्श सिंग 1964 ऑलिम्पिक आणि 1966 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणार्‍या टीमचा भाग होते. ‘1965 मध्ये युद्ध झाले होते. जालंधरमध्ये आमचे शिबिर होते. 1964 मध्ये आम्ही त्यांना हरवले आणि 1965 साली झालेल्या युद्धानंतर आशियाई स्पर्धेतही आम्ही त्यांनी मात दिली होती,’ असे गुरबक्श यांनी सांगितले. भारत-पाकिस्तान संबंधांवर या वेळी सर्वात अधिक क्रिकेट वर्ल्ड कपबाबत चर्चा होत आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली आणि हरभजन सिंगसह अनेक खेळाडूंनी भारताला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी केली आहे, तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानसोबत खेळून त्यांना हरवले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply