Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांना पुनश्च लोकसभेत पाठवा; आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तालुक्यात प्रचाराला वेग

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.

पनवेल शहरातही सायंकाळी जोरदार प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व

प्रमुख उपस्थितीत गुरुवारी देवीचापाडा येथे प्रचार करण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन प्रचाराच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी मतदारांना केले.  रणरणत्या उन्हाची पर्वा न करता आमदार प्रशांत ठाकूर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गाव, शहर, वाडी, वस्ती, वसाहती पालथ्या घालून महायुतीचा जोरदार प्रचार करीत आहेत. महायुतीचे उमेदवार  श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला अर्ज निगडी येथे दाखल केला. त्यानंतर प्रचार खर्‍या अर्थाने रंगू लागला आहे. गावोगावी फिरून प्रचार करण्यात आला. पनवेल, उरण शहरासह गावोगावी महायुतीने प्रचारात आघाडी घेत बारणेंच्या विजयाची खात्री दिली जात आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply