Breaking News

धोनीची खेळावरची निष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची : कोहली

बंगळुरू : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा संघातील अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. माझ्यासाठी त्याची खेळावरची निष्ठा महत्त्वाची असल्याचे कोहली म्हणाला.

इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात धोनीवरच भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने माजी कर्णधार धोनीची प्रशंसा केली. मी भारतीय संघात आल्यानंतर धोनीकडे दुसर्‍या पर्यायांचा विचार करण्याची संधी होती, मात्र धोनीने त्या काळात मला पाठिंबा देत तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. कोणत्याही तरुण खेळाडूला इतक्या लवकर तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळत नाही, असे सांगत कोहलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजीमधले बदल; धोनीला सर्व गोष्टींचा व्यवस्थित अंदाज येतो. याच कारणासाठी माझा कर्णधार म्हणून धोनीवर विश्वास आहे. पहिल्यापासून अखेरच्या चेंडूवर काय होणार आहे हे धोनीला माहीत असते. त्यामुळे धोनीसारख्या खेळाडूचे संघात असणे माझ्यासाठी फायदेशीरच आहे. अनेकदा लोक धोनीवर टीका करतात, पण माझ्यासाठी त्याची खेळावरची निष्ठा महत्त्वाची असल्याचे विराट म्हणाला

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply