Breaking News

रोहा बीडीओंकडून मढाली, वांदोली गावांची पाहणी

रोहे ः प्रतिनिधी : पाणीटंचाईचे सावट असलेल्या मढाली, वांदोली व वांदोली आदिवासी वाडी (ता. रोहा) या गावांची गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी पाहणी केली. या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, मात्र ते लांबून आणावे लागते. टंचाई भासली, तर या गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे पंडित राठोड यांनी पाहणी दरम्यान सांगितले. रोहा तालुक्यातील मढाली, वांदोली व वांदोळी या गावांना  राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र ज्या विहिरीवर ही योजना राबवली आहे, त्या विहिरीचे पाणी कमी होत असल्याने सध्या ही योजना बंद ठेवण्यात आली आहे. तर वांदोली आदिवासीवाडीतील बांधव रस्त्याच्या पलीकडे असलेल्या विहिरीवरून पाणी भरत आहेत. पाण्यासाठी त्यांना लांब जावे लागत आहे. पाणीटंचाईची शक्यता असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी मढाली, वांदोली व वांदोली आदीवासीवाडी या गावांची पाहणी करून, पाणीपुरवठ्याबाबत आढावा घेतला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply