Breaking News

उरण येथे संत रोहिदास जयंती साजरी

उरण : वार्ताहर

उरण येथे संत रोहिदास युवक संस्था उरण आणि रोहिदास स्थानिक पंचायत उरणच्या वतीने राष्ट्रसंत, संतशिरोमणी गुरू रोहिदास यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी गुरू रविदास विश्व महापीठाचे राष्ट्रीय मंत्री नामदेव कदम, सखाराम चव्हाण, नीलेश तळकर, अ‍ॅड. गजानन कारावकर, पनवेल तालुका चर्मकार संघटना अध्यक्ष  जगदीश जळगावकर, रोहिदास समाज पंचायत संघाचे माजी उपाध्यक्ष नंदू तळकर, जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा चर्मकार संघटना मा. गणेश चव्हाण, रोहिदास समाज पंचायत संघाचे उपाध्यक्ष वि. पेवेकर, सरचिटणीस रोहिदास समाज पंचायत संघ आदी उपस्थित होते.

या वेळी समाजातील संतोष भोईर, रोहिदास समाज पंचायत संघाचे चिटणीस किरण विनेरकर, श्री. काळे, कवी विलास देवळेकर, उरणचे प्रकाश केणी  यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, तसेच अपंग असूनही महाड येथील चांभारगडावर चढून जाणारे प्रकाश नागावकर, रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक आंबडकर, पनवेल तालुका उपाध्यक्ष गणेश आंबोलकर, वाशी स्थानिक पंचायतीचे अध्यक्ष मेढेकर, मुबई येथील शिरीषकर, रायगड जिल्हा चर्मकार संघटना जिल्हा प्रतिनिधी दिलीप पाबरेकर, प्रशांत म्हशीलकर यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सरचिटणीस राकेश केळकर यांनी, तर आभार प्रदर्शन केशव साळवी यांनी केले. महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रमाची जबाबदारी नीलम चव्हाण, अनुजा साळवी, पूजा नांदगावकर यांनी पार पाडली. कार्यकम यशस्वी करण्याकरिता दीपक श्रीवर्धनकर, चंद्रकांत चव्हाण, सचिन नांदगावकर, नितीन चव्हाण, सुचिता आंबेतकर, योगेश जानवलकर, छोटू अहिरे, जितेंद्र दबडे, शैलेश चव्हाण, रवी पेवेकर, दशरथ चव्हाण, प्रकाश नागावकर, अनिल शिंदे, राहुल चव्हाण, फागुन वासनकर, विजय गायकवाड आदींनी सहकार्य केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply