उरण : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण शहरात दुचाकी, तीनचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचे याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उरण शहरातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने यांचा (प्रवास) प्रवासी व तसेच रिक्षा, टॅक्सी, (अॅप आधारित ओला, उबेर व तत्सम वाहनांसह) यासाठी वापर करण्यास 28 मार्च 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.