Wednesday , June 7 2023
Breaking News

नीलेश पाटील यांचा वाढदिवस साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ सामाजिक मंडळाच्या वतीने वह्यावाटप, तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नीलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पनवेल तालुक्यातील बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप, तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आल्या. या वेळी शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच शिल्पा पवार, बबन पवारत, भरत पाटील, उपसरपंच संगीता भुतंबरा, माजी सरपंच सुवर्णा पाटील, लता पाटील, माजी सरपंच संजय गायकर, गोपाळ पाटील, परशुराम पाटील, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष दत्तात्रेय ढवले, नीलेश पाटील यांची आई सुनीता पाटील, पत्नी मित्तल पाटील, चिखले ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, दिलीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नीलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.