Wednesday , June 7 2023
Breaking News

पेण नगर परिषदेची भोगावती नदी स्वच्छता मोहीम

 

पेण : प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेच्या वतीने प्रशासक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोगावती नदी स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली.
पेण नगर परिषदेने 25 कंत्राटी सफाई कामगारांच्या मदतीने दोन ट्रॅक्टर व कचरा ट्रॉली घेवून भोगावती नदीतून 15 ते 20 टन जलपर्णी काढली. पेण नगर परिषदेमार्फत अशाच प्रकारे स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे. दोन महिन्यापूर्वीही नदीतून जलपर्णी काढण्यात आली होती. मात्र जलपर्णीमध्ये झपाट्याने वाढ होत असून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आता 25 कंत्राटी सफाई कामगार यांच्या मदतीने नदीतून 15 ते 20 टन जलपर्णी काढण्यात आली. दोन ट्रॅक्टरच्या मदतीने सदर जलपर्णी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे वाहून नेण्यात आला.
पेण नगर परिषदेचे प्रशासक जीवन पाटील, लेखापाल किरण शहा, आरोग्य अभियंता अंकिता इसळ, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, महेश वडके यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व सर्व मुकादमही या मोहिमेत सहभागी झाले होते.