Breaking News

संपूर्ण वेळ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

नवी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याबाबतचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मान्यतेने आदेश काढले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी आमदार म्हात्रे यांना दिले आहे. यामुळे व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व व्यापारी वर्गातून आमदार म्हात्रे यांचे आभार मानले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने व मॉल्स हे संपूर्ण वेळ खुली ठेवण्याबाबत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, माजी सभापती संपत शेवाळे, व्यापारी अध्यक्ष प्रमोद जोशी अशा शिष्टमंडळासह तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांजकडे मागणी केली होती. तदनंतर आयुक्त अभिजित बांगर यांजकडेही सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला व सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने मिशन बिगीन अगेन नुसार हद्दीतील दुकानांना सम विषम तारखेला परवानगी देण्यात आली होती. दिवसाआड पद्धतीमुळे व्यवसाय होत नसल्याने व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे नियमित व्यवसाय करण्यास मुभा देण्याची तसेच संपूर्ण वेळ दुकाने खुली ठेवण्याबाबतची लेखी मागणी भाजपच्या म्हात्रे यांनी केली होती.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेमार्फत लॉकडाऊन जाहीर झाला. टाळेबंदीमुळे दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होते. त्याचे उद्योजक व व्यापार्‍यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊनचे नियम जाहीर करताना सम-विषम तारखेप्रमाणे छोटया-मोठया व्यापार्‍यांची दुकाने सुरू ठेवलेली होती. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून महापालिका हद्दीतील छोटया-मोठया उद्योगधंद्यांना देखील दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी अशी संपूर्ण नवी मुंबईतील व्यापार्‍यांनी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ तसेच आयुक्त अभिजीत बांगर यांजकडे सातत्याने केली होती. व्यावसायिक व व्यापार्‍यांची मागणी ही रास्त असल्याने व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळासह आयुक्तांची भेटही घेतली होती.

आयुक्तांनीही सदरबाबत सकारात्मक दाखवीत शनिवार (दि.15) पासून दोन्ही बाजूचे दुकाने नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी गर्दी टाळणे तसेच सामाजिक अंतर पाळणे याशिवाय इतर नियम व अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी त्याचे पालन करणे अनिवार्य आहे, असे आ. म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply