Breaking News

भाजप युवा मोर्चाच्या शिलेदारांनी अनुभवला ‘पावनखिंड’चा थरार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीच्या कठीण काळातून सर्वजण सावरत असताना नव्या जोमाने संघटना बांधणी करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या चर्चेत असलेला ‘पावनखिंड’ हा सिनेमा एकत्र पाहिला. यातून या युवकांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्फुर्ती मावळ्यांमध्ये बाणवली होती त्याचा चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रितरित्या अनुभव घेण्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांनी शुक्रवारी (दि. 25) रात्री 8.30 वाजता ओरिअन मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहात एक स्क्रीन बुक केली होती. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, राजेश्री वावेकर, भाजप शहर सरचिटणीस अमरिश मोकल, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे ‘पावनखिंड’ चित्रपटात शिवा काशिद यांची भूमिका साकारणार्‍या पनवेलमधील युवा अभिनेते अजिंक्य ननावरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांचा संदेश स्क्रीनवरून प्रसारित करण्यात आला, तर सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवराय, शूर बाजीप्रभू देशपांडे, मावळे यांच्यापासून प्रेरणा घेत सर्व युवक व युवती घरी परतले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply