Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / ‘रोहितशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही’

‘रोहितशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही’

मुंबई : प्रतिनिधी

इंग्लंडमध्ये 30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आयपीएल संपल्यामुळे भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनने आतापर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारताला ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.

आयपीएलच्या मागच्या दोन महिन्यांमध्ये शिखर धवनने पृथ्वी शॉबरोबर ओपनिंग केली होती. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माशी बोलत आहेस का? असा प्रश्न धवनला विचारण्यात आला. तेव्हा ‘रोहित शर्माशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही. जर तुम्ही एवढी वर्ष एकत्र खेळत असाल तर एकमेकांना चांगलं ओळखता. रोहितसोबत मी काही विशेष करत नाही. पृथ्वीसोबतपण असंच होतं. जर एक जण जलद रन करत असेल, तर दुसर्‍याने त्याला साथ दिली पाहिजे,’ असं धवन म्हणाला.

‘वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दबाव येत नाही. हे माझ्यासाठी रोजचं काम आहे. माझ्या डोक्यात असलेल्या गोष्टी स्पष्ट असाव्यात, यासाठी मी आग्रही असतो. कधी तुमच्या रन बनतात तर कधी बनत नाहीत, पण मी सर्वश्रेष्ठ द्यायचा प्रयत्न करतो,’ असं वक्तव्य धवनने केलं. आयपीएलच्या या मोसमात शिखर धवनने 521 रन केले. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 नंतर लगेचच वनडे क्रिकेट खेळणं आव्हानात्मक नसेल, असं धवनला वाटतं. ‘आयपीएलमधली कामगिरी सकारात्मक होती. चांगल्या कामगिरीमुळे तुम्ही लयीत येता. ऑस्ट्रेलियाविरुद्धही माझं प्रदर्शन चांगलं झालं होतं. फॉरमॅट बदलल्यामुळे काही फरक पडत नाही, पण मानसिकता बदलली तर सगळं बदलायला एक मिनिटाचा वेळही लागत नाही,’ अशी प्रतिक्रिया धवनने दिली. ‘वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची बॉलिंग संतुलित आहे. आमच्याकडे बुमराह, भुवनेश्वर आणि शमीसारखे मजबूत फास्ट बॉलर आहेत. हार्दिक पांड्याही चांगला बॉलर आहे. बुमराह जगातला नंबर 1 बॉलर आहे. आमचे स्पिनरही चांगले आहेत,’ असा विश्वास धवनने व्यक्त केला. ‘कोहली आणि धोनीसारखे अनुभवी खेळाडू कठीण परिस्थितीमधून टीमला बाहेर काढू शकतात. मोठ्या स्पर्धांमध्ये हा अनुभव कामाला येतो. प्रतिभावान युवा खेळाडू आणि अनुभव याचं योग्य मिश्रण भारतीय टीममध्ये आहे,’ असं धवन म्हणाला.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp