Tuesday , May 21 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / आनंददायी जीवन जगण्यासाठी फेस्ट शिबिर

आनंददायी जीवन जगण्यासाठी फेस्ट शिबिर

रसायनी : प्रतिनिधी 

हार्टफुलनेस वेलनेस फेस्ट या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हजारो नागरिकांनी ध्यानाच्या आणि स्वास्थकर व्यायामाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला. या वेळी रायगड, पनवेल, नवी मुंबईसह कल्याण, घाटकोपर, टिटवाळा आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी  सहभाग घेऊन सराव केला. या वेळी झुम्बा आणि पॉवर योग सत्रांतून प्रेक्षकांना अतिरिक्त चरबी कमी करण्याची प्रेरणा मिळाली. या शिबिरात चेअरयोग, मस्तिष्क व्यायाम, शारीरिक शिथिलीकरण आणि ध्यान कार्यक्रम घेण्यात आले.

दरम्यान, हार्टफुलनेस वेलनेस फेस्टच्या वतीने योग दिन 21 ते 23 जून 2019 रोजी सिडको एक्झिब्युशन सेंटर वाशी येथे तीन दिवसीय योगा  फेस्ट उत्सव पार पडणार असल्याचे वेलनेस फेस्टचे हेड कोर ऑर्गनायझेशन डॉ. निवेदिता श्रेयांश यांनी सांगितले.

Check Also

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी …

Leave a Reply

Whatsapp