Tuesday , May 21 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेर-भोम-कळंबुसरे, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 14) उरण तालुक्यातील श्री दत्त मंदिर, चिरनेर-कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व श्री सत्यनारायणाची पूजा मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी रात्री शिवसंत, प्रसिद्ध व्याख्याते मिलिंद एकबोटे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

आपल्या व्याख्यानात मिलिंद एकबोटे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण जिवंत इतिहास नागरिकांसमोर उभा केला. देशासाठी, धर्मासाठी शंभुराजे यांनी आपले स्वतःचे कसे बलिदान दिले याविषयी उपस्थितांना माहिती दिली. शंभुराजांची स्मृती निरंतर जपण्यासाठी वडु बुद्रुक येथे शंभुतीर्थ छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक साकारण्याचा संकल्प सुरू असल्याची माहिती एकबोटे यांनी दिली. ‘शंभुतीर्थ’ या नावाने संभाजी महाराजांच्या स्मारकाचे दगडी स्वरूपातील बांधकाम पूर्ण झाले असून आता शंभुछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारित शिल्पसृष्टीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. तेंव्हा नागरिकांनी, शिवभक्तांनी निःस्वार्थ भावनेने राष्ट्रीय कार्य समजून या स्मारकास आर्थिक मदत करून सहाय्य करावे, असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी या वेळी केले. दरवर्षी छावा प्रतिष्ठानच्या वतीने चिरनेर येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याबाबत एकबोटे यांनी छावा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे कौतुक केले व शिवकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

छावा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी श्री संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पहार देऊन गौरव केला जातो. या वर्षी 2019 चा वृक्षलागवड व स्वच्छता क्षेत्रातील पुरस्कार सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, तर फॉन या संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र जयवंत ठाकूर यांना अनेकांचे जीवन वाचविल्याबद्दल श्री छत्रपती संभाजी महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Check Also

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी …

Leave a Reply

Whatsapp