Tuesday , May 21 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / मतमोजणीची कामे चोखपणे पार पाडावीत; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

मतमोजणीची कामे चोखपणे पार पाडावीत; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

रायगड ः प्रतिनिधी

रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) क्रीडा संकुल नेहुली येथे होणार आहे. या वेळी मतमोजणीसाठी संबंधित विभागांवर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात 32-रायगड लोकसभा निवडणूक मतमोजणीसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा कोषागार अधिकारी मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे, रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी बोंबले आदी उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनुसार होणार्‍या रिपोर्टची झेरॉक्स कॉपी ठेवणे आवश्यक आहे, तसेच येथील वाहन, पार्किंग, कर्मचार्‍यांची नाष्टा, भोजन व्यवस्था, पाणी व स्वच्छता, अ‍ॅम्ब्युलन्स, मंडप आणि सुरक्षा व्यवस्थेची ज्या विभागांवर जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी योग्यरीतीने पार पाडावी. यात हलगर्जीपणा झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मतमोजणीच्या ठिकाणी बसवण्यात येणार्‍या वातानुकूलित यंत्रणेचे काम 19 मेपर्यंत पूर्ण करावे, असेही आदेश जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी दिले. या बैठकीला विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी …

Leave a Reply

Whatsapp