Tuesday , May 21 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीला पाकमध्ये अटक

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीला पाकमध्ये अटक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वाँटेड अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरावालामधून अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने जमात-उल-दावा, फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी निगडित 11 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली.

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मक्की मोस्ट वाँटेड होता. या हल्ल्यात तब्बल 166 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. मक्कीवर भडकाऊ भाषण आणि सरकारच्या एफएटीएफच्या गाइडलाइन्सवर टीका करण्याचा आरोप आहे, तसेच मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अ‍ॅक्टनुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. यापूर्वी मक्कीने एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची गरळ ओकली होती. 2010मध्येही भारतविरोधी वक्तव्यांवरून मक्की चर्चेत राहिला होता. त्याने पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटांपूर्वी मुझफ्फराबादमध्ये एक भाषण दिले होते, तसेच पुण्यासह भारतातील तीन प्रमुख शहरांतमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर भारताच्या मागणीवरून अमेरिकेने मक्कीला दहशतवादी घोषित केले होते. काही काळ आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेत चीनने खोडा घातल्याने विलंब

झाला होता.

Check Also

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी …

Leave a Reply

Whatsapp