Wednesday , October 28 2020

केदार जाधव फिट!

मुंबई : प्रतिनिधी

वर्ल्डकपच्या 12 दिवसाआधी टीम इंडियासाठी एक खूशखबरी आहे. आयपीएलमध्ये दुखापत झालेला भारतीय खेळाडू केदार जाधव आता फिट झाला आहे. टीम इंडियासोबत 22 मेला तो लंडनला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये दुखापत झाल्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत शंका होती. त्यामुळे चौथ्या जागी कोणत्या खेळाडूला खेळवायचं याचा देखील प्रश्न उपस्थित झाला होता, पण आता तो पूर्णपणे फिट

झाल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गुरुवारी 16 मेला झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो पूर्णपणे फिट असल्याचं समोर आलं आहे.

टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहार्टने बीसीसीआयला रिपोर्ट सोपवला आहे. ज्यामध्ये केदार जाधवला फिट घोषित करण्यात आलं. आयपीएलमध्ये एका सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला होता. त्यामुळे भारतीय टीमच्या चिंता वाढल्या होत्या.

आता केदार जाधव फिट झाल्याने तो भारतीय टीमसोबत वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्डला रवाना होणार आहे. भारतीय टीममध्ये तो एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. केदार हा सहाव्या स्थानी बॅटिंग करतो. सोबतच तो सहाव्या बॉलरची कमतरता देखील दूर करतो. बॉलर म्हणून देखील त्याची कामगिरी चांगली आहे. केदार जाधव सध्या जगातील सर्वात उपयोगी क्रिकेटर्सच्या यादीत टॉपवर आहे. त्याच्या टीममध्ये असण्याने भारताचा विजयाची शक्यता 80.39 टक्के आहे. केदार जाधव यांच्यानंतर या यादीत वेस्टइंडीजचा माजी क्रिकेटर अँडी रॉबर्ट्स, ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर एंड्रयू साइमंड्स आणि वेस्टइंडीज माजी क्रिकेटर लॅरी गोम्स यांचं नाव आहे.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp