Friday , May 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज

आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज

मुंबई : प्रतिनिधी

क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप… इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न 2019 चा वर्ल्ड कप उंचावणार कोण? इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी त्यांनी 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा आयोजन केले होते. पण, यंदाचा इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता हा वर्ल्ड कप तेच जिंकणार असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यामुळेच या दोन संघांच्या सामन्यांच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यांच्या तिकिटांची किंमतही अन्य संघांच्या तुलनेत

अधिक आहे.

30 मे ते 14 जुलै या कालावधीत 48 सामने होणार आहेत. या सामन्यांच्या 8 लाख तिकिटांसाठी 148 देशांतून जवळपास 3 कोटी अर्ज आले आहेत. हे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या तिकिटांचा काळाबाजार होऊ नये याकरिता आयोजन करडी नजर ठेवून आहेत. भारत आणि इंग्लंडच्या चाहत्यांना तिकिटांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. या स्पर्धेतील सर्वात स्वस्त तिकीट हे 40 डॉलर म्हणजेच 3500 रुपयांचे आहे, परंतु ही किंमत केवळ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्यासाठी आहे. महत्त्वाच्या सामन्यांसाठी चाहत्यांना 5000 ते 6200 रुपये मोजावे लागत आहेत. सर्वाधिक तिकिटांची किंमत ही 9000 पर्यंत आहे. आयसीसीने जवळपास 80 हजार तिकिटांची किंमत 1800 किंवा त्यापेक्षा कमी आणि 2 लाख तिकिटांची किंमत 4500 किंवा त्यापेक्षा कमी ठेवली आहे.

-वर्ल्ड कपचे थिमसाँग झाले लाँच लंडन : इंग्लंडमध्ये होणार्‍या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीकडून ‘स्टॅन्ड बाय’ हे अधिकृत गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ब्रिटनची गायिका लोरिन आणि रुडिमेंटल या बॅन्डने या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं इंग्लंडच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवतं. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषकांच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या वेळी मैदानावर आणि विश्वचषकाशी निगडित कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजवण्यात येणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं काऊण्टडाऊन सुरू झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 30 मे पासून सामन्यांना सुरुवात होणार असून 5 जून रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे.

Check Also

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …

Leave a Reply

Whatsapp