Saturday , October 16 2021
Breaking News

निवडणूक निकालांसाठी उजाडणार शुक्रवारची पहाट

मुंबई ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजणीसाठी हा अतिरिक्त वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी रात्री दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. देशभरातील 543पैकी 542 मतदारसंघांच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. त्यानंतर कोणता पक्ष जिंकणार, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट होईल.

यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटमधील मतांचीही मोजणी होणार आहे. यासाठी कर्मचार्‍यांची ड्युटीही लावली असून सगळ्यांना याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या वेळी येथे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट आणि मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही करण्यात येणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक याप्रमाणे पाच मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी अतिरिक्त पाच तास लागणार असून, अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री दोन वाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही तांत्रिक कारणावरून उशीर झाला किंवा कोणी हरकत घेतली, तर मतदानयंत्र निवडणूक अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात येईल आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. पोस्टल मतांची खातरजमा करण्यासाठी ईटीपीबीएस पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य लिफाफा, मतपत्रिका असलेला लिफाफा व प्रत्यक्ष मतपत्रिका यावरील बारकोड स्कॅन करून मतपत्रिकेची खात्री झाल्यानंतरच ती मोजणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएमची मोजणी होते. एकाच वेळी जास्तीत जास्त 14 ईव्हीएमची मोजणी केली जाते. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट जोडले असून स्लिपची मोजणीही त्याच वेळी होणार आहे. प्रक्रियेनुसार सर्वात आधी एतच्वरील उणच्या (कंट्रोल युनिट) बटणाने मोजणी होईल. यानंतर पाचही व्हीव्हीपॅटचे निकाल कंट्रोल युनिटच्या आकड्यांशी जुळवले जातील.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp