Thursday , June 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / पहिले षटक, पहिली विकेट; इम्रान ताहीरचा विक्रम

पहिले षटक, पहिली विकेट; इम्रान ताहीरचा विक्रम

लंडन : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावून चांगला डाव खेळला. त्यात आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने पहिलेच षटक फिरकीपूट इम्रान ताहीरच्या हातात चेंडू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सामन्याची सुरुवात एका फिरकीपटूने केली. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या ताहीरने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला माघारी पाठवत वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात पहिल्या षटकात विकेट जाण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी 1992च्या वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम घडला होता.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू …

Leave a Reply

Whatsapp