Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू

अकोला : प्रतिनिधी

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या केंद्रावर विमा काढण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या आत ऑनलाइन अर्ज भरता न आल्यास विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असे शासनाने म्हटले आहे. याकरिता शेतकर्‍यांनी पिकांच्या संरक्षणासाठी मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आवश्यक कागदपत्रांसह विमा काढणे अपरिहार्य आहे, तसेच कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयांसह बँक व आपले सरकार सेवा केंद्राशी शेतकर्‍यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, गडचिरोली, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बीड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, लातूर तसेच अहमदनगर, परभणी, वाशिम, औरंगाबाद, बुलडाणा, अमरावती, धुळे, सोलापूर, सांगली, अकोला व यवतमाळ या 30 जिल्ह्यांसाठी अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीत विमा काढला जाणार आहे.

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp