Saturday , December 7 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन घरत कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. 5) पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. विद्यालयाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वृक्षांचे रोपण करत पर्यावरणाचे महत्त्व सांगत कार्यक्रम झाला. यावेळी टाटा प्रोजेक्टचे अधिकारी व्ही. सुशील नाथन व इतर कर्मचारी, तसेच विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, पर्यवेक्षक अरुण जोशी, गौरी देशपांडे, सहा. शिक्षक कैलाश रक्ताटे, परेश पावसकर, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

आगरी कोळी कराडी महोत्सवाचे परेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मधील गुजराती शाळेच्या मैदानात दक्षराज सामाजिक मित्रमंडळ करंजाडे यांच्यावतीने ‘आगरी …

Leave a Reply

Whatsapp