Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / मुंबई-मालवण एसटीला अपघात; सात प्रवासी जखमी

मुंबई-मालवण एसटीला अपघात; सात प्रवासी जखमी

पनवेल : बातमीदार

मुंबई येथून मालवणला जाणार्‍या एसटीला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीमधील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सायन-पनवेल मार्गावर कळंबोली येथे घडली. या अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील सर्व जखमींना उपचार करून सोडून देण्यात आले. मुंबई सेंट्रल येथून मालवणला जाणारी एसटी कळंबोली सिग्नलजवळ आली असताना पाठीमागून येणार्‍या आशयर टेम्पोचालकाने सिग्नल तोडून एसटीला धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील सात प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर आयशर टेम्पोचालक पळून गेला असून त्याचा टेम्पो ताब्यात घेऊन त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये बसचा वाहक दिनेश साळकर याच्यासह रवींद्र तरल (36), अकबर चिपळूणकर (60), इरफान मांद्रे (45), सुरेश मोरे (50), राजेश तांबे (38) आणि जितेंद्र काळंगे (36) या सहा प्रवाशांचा समावेश आहे. या अपघातात एसटी बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

Check Also

फिरत्या चाचणी सुविधेला प्रारंभ; ‘मिशन झीरो’अंतर्गत रुग्णांचा शोध; 40 वाहने सज्ज

पनवेल ः बातमीदार नवी मुंबई शहरात ‘मिशन झीरो’अंतर्गत रुग्णांचा तातडीने शोध घेण्यासाठी पालिकेच्या वतीने भर …

Leave a Reply

Whatsapp