Thursday , June 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या

नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या

पनवेल : वार्ताहर

पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील साडेसातशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचार्र्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपायांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशी कर्मचार्‍यांना सोयीनुसार पोलीस ठाणे त्याचबरोबर शाखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदली झालेल्यांमध्ये बर्‍याच अंशी समाधानाचे वातावरण आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र त्याचबरोबर पनवेल-उरण तालुक्याचा समावेश होतो. दोन परिमंडळ असलेल्या पोलीस आयुक्तालयात पाच हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी काम करतात. पूर्वीच्या तुलनेत पोलीस ठाण्यांची संख्या वाढलेली आहे. नियमाप्रमाणे एका ठिकाणी पाच वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांची दरवर्षी सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. यंदाही 764 पोलीस कर्मचार्‍यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यानुसार 316 पोलीस शिपायांच्या 4 जूनच्या परिपत्रकात बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 1 जून रोजी 166 पोलीस हवालदाराच्या नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत, तर 2 जून रोजी 192 नाईक पदावर असलेल्या कर्मचार्‍यांची दुसर्‍या ठिकाणी कर्तव्यासाठी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. बदल्यांमध्ये 37 महिला व पुरुष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त  पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी 53 कर्मचार्‍यांची विनंती बदली मंजूर केली आहे, तर 70पेक्षा जास्त विनंत्या अमान्य करण्यात आल्या.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू …

Leave a Reply

Whatsapp