Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / व्यापार्‍यांना थकीत कर भरण्यासाठी अभय योजना जाहीर

व्यापार्‍यांना थकीत कर भरण्यासाठी अभय योजना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

प्रलंबित कर, व्याज, दंड, तसेच प्रलंबित विलंब शुल्क यांचा ठराविक प्रमाणात भरणा केल्यास नोंदित व अनोंदित व्यापार्‍यांची उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत 30 जून 2017 पर्यंत राबविण्यात येणार्‍या 11 कायद्यांतर्गत देय कर थकबाकीसाठी या अभय योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ही योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून, 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 या पहिल्या टप्प्यात विवादीत व अविवादीत रकमेचा भरणा करून अर्ज केल्यास मिळणारी सवलत ही दुसर्‍या टप्प्याच्या कालावधीत म्हणजेच 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान मिळणार्‍या सवलतीपेक्षा जास्त आहे.  महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत विक्रीकर कक्षेत बसणार्‍या ज्या व्यापार्‍यांचे कर थकीत आहेत अशा नोंदित व अनोंदित व्यापार्‍यांनी पहिल्या टप्प्यात आवश्यक रकमेचा भरणा करून थकीत करापासून मुक्ती करून घेण्याचे आवाहन राज्यकर विभागाने केले आहे.

या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे, वैधानिक आदेशानुसार भरावयास आलेली रक्कम, विविध 11 कायद्यांतर्गत विविरणपत्रानुसार भरावयाची शिल्लक रक्कम, 704 ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरने कर भरावयास सुचित केलेली रक्कम, विविध 11 कायद्यांपैकी कुठल्याही कायद्यांतर्गत फक्त थकबाकीची नोटीस आलेली असेल तरीही किंवा व्यापार्‍याला जर स्वतःचा करभरणा स्वयंनिर्धारित करावयाचा असेल इत्यादी गोष्टींसाठी ही योजना लागू आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ ुुु.ारहरसीीं.र्सेीं.ळप येथे दिलेली आहे, तसेच या सेटलमेंट कायद्याविषयी काही अडचणी, सूचना व प्रश्न असल्यास र्ींरींरापशीीूं2019सारळश्र.लेा या ई-मेलवर मेल सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp