Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल महानगरपालिकेकडून दिव्यांगांना मिळणार निर्वाह भत्ता

पनवेल महानगरपालिकेकडून दिव्यांगांना मिळणार निर्वाह भत्ता

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांगांना महापालिका लवकरच निर्वाह भत्ता सुरू करणार आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेप्रमाणे सिडकोकडून हस्तांतरित होणार्‍या बाजाराच्या जागेत पाच टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी स्व. सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांबरोबर सोमवारी (दि. 10) झालेल्या बैठकीत दिल्याने संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता महापालिकेत महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, आरपीआय कोकण विभाग अध्यक्ष जगदिश गायकवाड, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, उपायुक्त संध्या बावनकुळे, सहआयुक्त तेजस्विनी गलांडे, स्व. सामाजिक संघटनेचे मंगेश मालोंडकर, किसन साठे, रेखा दास, कमल शेडेकर, संजय इवलेकर यांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

या वेळी दिव्यांगांना फेरीवाला क्षेत्रात जागा देण्यात यावी, या मागणीवर बोलताना आयुक्त गणेश देशमुख यांनी सिडकोकडून हस्तांतरित होणार्‍या बाजाराच्या जागेत पाच टक्के जागा राखीव ठेवण्याची अट सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठेवल्याने आम्ही 63 बाजारांत पाच टक्के जागा राखीव ठेवणार असल्याचे सांगितले. अपंगांचा सर्व्हे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने पूर्ण करून मेंटली रिटायर्ड आणि अर्धांगवायू आल्याने ज्यांना अपंगत्व आले आहे, त्यांना 30 जूनपूर्वी निर्वाह भत्ता सुरू करण्यात येईल. दरवर्षी स्थानिक नगरसेवकाने त्यांचा हयातीचा दाखला देणे बंधनकारक असेल. दिव्यांगांना सायकल वाटप करण्यालाही त्यांनी मान्यता देऊन सर्व्हे झाल्यावर त्यांच्या वर्गवारीप्रमाणे संगणकापासून आवश्यक गोष्टी पुरवण्याची तयारी महापालिकेतर्फे दाखवण्यात आल्याने संघटनेच्या अध्यक्षा रेखा दास आणि मंगेश मालोंडकर यांनी समाधान व्यक्त केले.  

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp