Thursday , June 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / ‘आरटीआयएससी’ची नेत्रदीपक कामगिरी

‘आरटीआयएससी’ची नेत्रदीपक कामगिरी

उलवे : रामप्रहर वृत्त

पालघर कोलवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अ‍ॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने 40व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या या देदिप्यमान कामगिरीत मोलाचा वाटा प्राशिक्षक शिहान राकेश रमेश निवरेकर यांचा आहे.

शिबिराचे मुख्य आकर्षण असलेल्या काता, कुमिते या क्रीडाप्रकारांबरोबरच जिम्नॅस्टिक्स, ज्युडो, सेल्फ डिफेन्स, रेप डिफेन्स, कुबूडो ट्रेनिंग, कुमिते ट्रेनिंग, योत्रा हे प्रकारही होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विरंगुळा म्हणून फावल्या वेळात विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखी समृद्ध होईल. कराटे शिबिराचे आयोजन निहॉनसिकीचे मुख्य संचालक लक्ष्मीकांत सारंग यांच्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या देखभालीवर आणि प्रशिक्षणावर सर्व सेंपाय आणि सेंन्साय जातीने पाचही दिवस अहोरात्र लक्ष देत होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू …

Leave a Reply

Whatsapp