Friday , February 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / राज्य टेबल टेनिस संघटनेच्या कोषाध्यक्षपदी संजय कडू

राज्य टेबल टेनिस संघटनेच्या कोषाध्यक्षपदी संजय कडू

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय सुदाम कडू यांची महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेची निवडणूक लोणावळा येथे रविवारी (दि. 9) बिनविरोध झाली. राज्यातील 20 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी शशांक वाघ यांच्या देखरेखीखाली निवडणूक झाली. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव महेश लोहार, तसेच भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सहसचिव जयेश आचार्य यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनमध्ये गेली 32 वर्षे संजय कडू हे कार्यवाह म्हणून, तसेच स्कूल गेमचे चेअरमन म्हणून कार्य करत आहेत. संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील असंख्य मुले व मुलींनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या कामी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोशिएशनतर्फे आदर्श जिल्हा टेबल टेनिस संघटना पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला.

गेल्या वर्षी वडोदरा गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय अजिंक्यपद टेबल टेेनिस स्पर्धेत कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघाने सांघिक सहा प्रकारांमध्ये चार सुवर्ण, एक रौप्य, तसेच एकेरीमध्ये चार सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदक अशी भरीव कामगिरी केली होती.

Check Also

रायगडमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाबाबत सरकारची अनास्था

अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना मंत्र्यांचे संदिग्ध उत्तर अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक व …

Leave a Reply

Whatsapp