Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग

खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त

पावसाळा तोंडावर आला असताना खांदा कॉलनी येथे मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. पालिकेकडून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. याबाबत नगरसेवक संजय भोपी यांनी पालिकेला 22 एप्रिल 2019 रोजी पत्र देऊन सूचित केले होते. या पत्रात भोपी यांनी, पावसाळ्यात होणार्‍या अतिवृष्टी तसेच वादळी वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या तुटून आर्थिक, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असून, प्रभाग 15 मधील या झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करावी, अशी मागणी केली होती. या पत्राच्या अनुषंगाने खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवक संजय भोपी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp