Sunday , November 17 2019
Home / महत्वाच्या बातम्या / सोमवारपासून शाळा प्रवेशोत्सव

सोमवारपासून शाळा प्रवेशोत्सव

अलिबाग ः प्रतिनिधी

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 17 जून ते 2 जुलै या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.

 शाळापूर्व दिवशी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार आहे. प्रवेशपात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकांवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेशपात्र बालकांची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी तसेच सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या गृहभेटींचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

कर्नाळा बँकेतील घोटाळा अखेर उघड

भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी …

Leave a Reply

Whatsapp