Friday , May 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करावे

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करावे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामुळे रखडल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे काम 25 जूनपूर्वी पूर्ण करून द्यावे, असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 12) सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यावर कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्या ठरलेल्या दिवशी आपण पुन्हा कामाची पाहणी करायला येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे काम अनेक महिने रखडल्याच्या तक्रारी आल्याने बुधवारी सकाळी 10.30 वाजता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. या वेळी  सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नितीन पाटील, संतोष शेट्टी, आरोग्य खात्याच्या उपसंचालक गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी, पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ एमपल्ले, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सतीश श्रावदे, उपअभियंता सत्यनारायण कांबळे आदी उपस्थित होते.

पनवेल महापालिका हद्दीतील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम अनेक महिने रखडले आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयाच्या कामाला भेट दिली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालयाचे काम रखडल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता  सतीश श्रावदे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे दरवाजे, शौचालयाची कामे, सफाई आणि लादी पॉलिश 15 दिवसांत पूर्ण करून आरोग्य खात्याला इमारतीचा ताबा देण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य उपसंचालक गौरी राठोड यांनी आमची मशिनरी आली असून, ती फिट करणे आणि 107 मंजूर पदांपैकी 54 पदे  प्रतिनियुक्तीने भरून रुग्णालय सुरू करता येईल. त्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागेल, अशी माहिती या वेळी दिली.

सोमवारपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन उरलेल्या कामांना मंजुरी घेण्याचेही या वेळी ठरले.

आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रथमच रुद्रावतार
नेहमी शांत असणार्‍या आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज प्रथमच रौद्रावतार धारण केला. ‘ठेकेदाराला 3.5 कोटींचे बिल दिले जात नाही’ असे असूनही ठेकेदाराने काम करायचे, नंतर डिपार्टमेंट तो जगणारच नाही अशी काळजी घेते, अशी टिप्पणी करीत त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Check Also

मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक

मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, …

Leave a Reply

Whatsapp