Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत पायल डान्स अॅकॅडमीचे सुयश

राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत पायल डान्स अॅकॅडमीचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त : ऑल इंडिया आर्टिस्ट असोसिएशनच्या 6 ते 10 जून दरम्यान शिमला, हिमाचल प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील नाटक आणि नृत्य स्पर्धेत 64 जणांचा गट सहभागी झाला होता. या स्पर्धेत पायल डान्स अ‍ॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पनवेलमधील कर्नाटक

संघ हॉलमध्ये बुधवारी (दि. 19) प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  या वेळी सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात येऊन, त्यांना मुख्य अतिथी डीएस मनोरंजनचे मालक  दीपक शेट्टी, चंचला बनकर, दिव्य फिटनेस सेंटरचे मालक सोनी तर्वे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुयश प्राप्त केल्यामुळे पायल डान्स अ‍ॅकॅडमी, तसेच विजेत्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp