Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / चौक भाजप महिला मोर्चाच्या विविध पदांच्या नियुक्त्या

चौक भाजप महिला मोर्चाच्या विविध पदांच्या नियुक्त्या

रसायनी : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत भाजपला सुयश मिळाल्याने स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी महिला संघटना नेमणूक करण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः महिला मोर्चासाठी बांधणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद विभागप्रमुखपर्यंत या नेमणुका आहेत.

रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या महिला विभाग अध्यक्षपदी मनाली यतिश शेमडेकर, तर चौक जिल्हा परिषद महिला विभाग अध्यक्षपदी अश्विनी माळी यांची निवड झाली आहे. कर्जत-खालापूरचे माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते नेमणुकीचे पत्र एक छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन व येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात एकसंघ काम करून विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करू, असे दोघींच्या बोलण्यातून आले. कार्यक्रमास तालुका युवा मोर्चा अध्यक्ष गणेश कदम व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp