Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा

पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम मोहसीन खान यांच्याकडे होते, मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहणारे वासिम खान मोहसीन यांच्या जागी काम पाहणार आहेत.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp