Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / सुधागडात एक हजार रोपांची लागवड

सुधागडात एक हजार रोपांची लागवड

सुधागड : राज्य शासनाने 33कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याचाच भाग म्हणून सुधागडच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील चिखलगाव ते करंजाई रस्त्याच्या दुतर्फा एक हजार खड्डे खोदून त्यामध्ये लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थित विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पं.स. सभापती साक्षी दिघे, वनक्षेत्रपाल आय. डी. जळगावकर, वनपाल सुधागड एन. व्ही. धुमाळ, चिखलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

धोंडसे प्राथमिक शाळा परिसरात वृक्षलागवड

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील धोंडसे येथील प्राथमिक शाळेत  नुकताच वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गावात वृक्षदिंडी काढून वृक्ष संवर्धनाचा नारा दिला. त्यानंतर शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.

 यावेळी झाडांचे सजीवांच्या आयुष्यातील महत्व आणि पर्यावरण समतोल राखण्यातील झाडांचे योगदान या विषयी दिलीप गावित यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक गोरख आघाव यांनी वृक्ष लागवडीचे व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp