Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / कृष्णाजी नाईक यांचे निधन

कृष्णाजी नाईक यांचे निधन

अलिबाग : प्रतिनिधी

निवृत्त उपजिल्हाधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांचे वृद्धत्वाने बुधवारी (दि. 10) निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन कर्तबगार मुले, आणि मुली, स्नुषा, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात महसुल अधिकारी म्हणून जबाबदारी बजावणार्‍या कृष्णाजी नाईक यांनी धुळे जिल्ह्यात निवडणूक अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या पार्थिवावर अलिबाग येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. 19) हरिहरेश्वर येथे करण्यात येणार असल्याची माहिती नाईक कुटूंबियांच्या वतीने देण्यात आली.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp