Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / प्रवाशांसाठी खूशखबर!

प्रवाशांसाठी खूशखबर!

रेल्वेचे तिकीट आरक्षण सोपे; एचओजी प्रणालीचा वापर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आगामी काळात रेल्वेचे तिकीट आरक्षण अधिक सुलभ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रेल्वेत आरक्षित जागेसाठी चार लाखांपेक्षा जास्त बर्थ सीट वाढणार आहेत. त्यासाठी रेल्वेकडून एक भन्नाट आयडिया लढविण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे डब्यातील लाइट आणि एअर कंडिशनरसाठी स्वतंत्रपणे जनरेटर डबा लावण्याची गरज भासणार नाही. केवळ इंजीनच्या माध्यमातून ही गरज र्पू्ण होणार आहे. देशातील रेल्वेचे जाळे भारतभर पसरले आहे. या रेल्वेतून दररोज कोट्यवधी भारतीय प्रवास करतात. जागेचे आरक्षण न मिळाल्याने कित्येकदा प्रवास उभ्याने किंवा जनरल डब्यातून करावा लागतो. त्यावर एक उपाय म्हणून रेल्वेने आणखी बर्थ सीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वेगाडीला लागणार्‍या विजेची निर्मित्ती दुसर्‍याच मार्गाने करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीला स्वतंत्र इंजीन लावण्याची गरज भासणार नाही. लिंक हाफमॅन बुश (एलएचबी) डबे असणार्‍या प्रत्येक गाडीत एक किंवा दोन जनरेटर बोगी लावण्यात येतात. या जनरेटर बोगीतून रेल्वेतील प्रवाशांच्या सोयीसाठी वीजपुरवठा केला जातो. त्यावर लाइट्स, एअर कंडिशनर आणि इतरही विजेची उपकरणे चालतात. एन्ड अँड जनरेशन (ईओजी) या नावाने यास ओळखले जाते, मात्र लवकरच जगभरात प्रसिद्ध हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणालीचा वापर भारतीय रेल्वे करणार आहे. या तंत्रज्ञानानुसार रेल्वेगाडीच्या वरून जाणार्‍या विजेच्या तारांपासून रेल्वेतील डब्यासाठी वीज वापरली जाते. ऑक्टोबर 2019पासून भारतीय रेल्वेचे जवळपास 5000 डबे एचओजी प्रणालीनुसार सुरू होणार आहेत. त्यामुळे रेल्वेतील जनरेटर बोगी हटविण्यात येतील. त्याजागी अतिरिक्त डबे लावले जाऊन जवळपास चार लाख बर्थ सीटची संख्या वाढणार आहे. यासोबतच रेल्वेच्या इंधनावर होणारा वार्षिक सहा हजार कोटींचा खर्चही वाचणार आहे. दरम्यान, सध्या चाचणी परीक्षणसाठी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन जनरेटर बोगी लावण्यात येत असल्याचे रेल्वेच्या संबंधित एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp