Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / कै. चांगू काना ठाकूर यांचे उद्या 17वे पुण्यस्मरण ; सीकेटी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कै. चांगू काना ठाकूर यांचे उद्या 17वे पुण्यस्मरण ; सीकेटी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांचे 17वे पुण्यस्मरण आणि चांगू काना ठाकूर तथा सीकेटी कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवारी (दि. 13) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनी येथील महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष तथा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व उपकार्याध्यक्ष लोकेश चंद्रा, पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, महापौर डॉ. कविता चौतमोल यांची उपस्थिती लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, मुकीद काझी, नगरसेविका सीता पाटील, कुसुम पाटील, हेमलता म्हात्रे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव, सदस्य संजय भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे  व सहकार्‍यांनी केले आहे.

Check Also

खांदा कॉलनीत रंगली अभंगवाणी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून …

Leave a Reply

Whatsapp