Saturday , August 24 2019
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / वाहून गेलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सापडले

वाहून गेलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सापडले

पनवेल : तालुक्यातील गाढी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य तीन दिवसांपूर्वी वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली. गुरुवारी (दि. 11) तिसर्‍या दिवशी आदित्य आंब्रे यांचा मृतदेह कामोठे जुई येथील खाडीत सापडला, तर महिलेचा रात्री उशीरा सापडला. 11 जुलै रोजी एनडीआरएफच्या जवानांना शांतीवन ते नेरे भागाच्या नदीमध्ये एक रेनकोट सापडला होता. हा रेनकोट मृत व्यक्तीचा आहे. त्यानंतर जुई खाडीत त्याचा मृतदेह सापडला. बॉर्डर सिक्युरिटी कल्याण ग्रुप, एनडीआरएफ पुणे, सिडको अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयामार्फत तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. गुरुवारी संध्याकाळपर्यंत या महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले.

Check Also

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी …

Leave a Reply

Whatsapp