Saturday , October 16 2021
Breaking News

दंगलींपेक्षा रस्ते अपघातात अधिक मृत्यू ः गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 31) राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयाकवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे 1.5 लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही बाब चिंताजनक आहे. रस्ते अपघात रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण 40 टक्के आहे. अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी महत्त्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दुरुस्ती विधेयकामध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.

देशभरात 30 टक्के वाहन परवाने बनावट आहेत. एखादी व्यक्ती चार-चार परवाने प्राप्त करू शकते, असे गडकरी यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या कोणत्याही अधिकारावर आम्हाला गदा आणायची नाही. हा राजकीय मुद्दा नाही, मात्र बेकायदा गोष्टी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp