Friday , June 25 2021
Breaking News

गणपतीसह गौरीपूजन उत्साहात सुरू

उरण : रामप्रहर वृत्त

गणेशोत्सवाबरोबर गौरीचा सणही राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी पहिल्या दिवशी येतात, दुसर्‍या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसर्‍या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतिक आहेत, असे मानून त्यांची पूजाअर्चा मनोभावे केली जाते. या वर्षी गुरुवारी (दि. 5) गौरीचे आवाहन करण्यात आले. पुढील दोन दिवस पाहुणचार घेऊन या गौरी शनिवारी (दि. 7) आपल्या घरी जातील. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी मूर्तीच्या रूपात आणल्या जातात. कोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी आणतात. गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. या वेळी मंडपात गणपती व गौरी असे भावनिक नाते असलेली मूर्ती पाहण्याची मजाच भक्तांना आंनददायी वाटते.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp