Wednesday , January 20 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / खोपोलीतील सार्वजनिक शौचालयांची होणार दुरुस्ती

खोपोलीतील सार्वजनिक शौचालयांची होणार दुरुस्ती

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम सुरू आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालयांची दुरुस्ती करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शौचालयांची पाहणी करून कामांच्या सूचना दिल्या.

खोपोली नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांमधील असुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगरपालिकेकडून स्वच्छता अभियान जोरदारपणे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत स्वच्छतेसंबंधी अनेक उपाययोजना व जनजागृतीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत प्राप्त निधीतून सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांची दुरुस्ती व डागडुजीही करण्यात येणार आहे. याबाबत मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी संबंधित विभागातील अधिकार्‍यांसोबत विशेष पाहणी करून  लवकरात लवकर प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करून कामे पूर्णत्वास आणण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

Check Also

रस्त्याच्या मध्यभागी मोबाइल टॉवरची उभारणी

कामोठेकरांचा संताप पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील …

Leave a Reply

Whatsapp