Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / भिंगारीतील शेकाप पदाधिकारी भाजपमध्ये

भिंगारीतील शेकाप पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. तशाच प्रकारे भिंगारी विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 3) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे शाल देऊन स्वागत केले.

पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, प्रभाग समिती अध्यक्ष गोपीनाथ भगत, तेजस कांडपिळे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, विकास घरत, प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे काळुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळकृष्ण परदेशी, कृष्णा परदेशी, माजी सरपंच दिलीप परदेशी, प्रदीप परदेशी, लक्ष्मण परदेशी, पंढरीनाथ परदेशी, रवींद्र परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp