Tuesday , August 11 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत

काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, भाजप नेते भीमसेन माळी, भाजपचे शहर सरचिटणीस अमरिश मोकल, जगदिश घरत आदी उपस्थित होते. मदन कोळी यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, शहर परिसरात भाजप अधिकाधिक मजबूत बनत चालला असल्याचे चित्र आहे.

Check Also

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

उरण : वार्ताहर दहावीच्या शालांत परीक्षेत उरण तालुक्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक …

Leave a Reply

Whatsapp