Friday , June 5 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड पाठिंबा

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीच्या विजयी हॅट्ट्रिकसाठी विविध संस्था आपला पाठिंबा दर्शवत असून, हे समर्थन वाढतच आहे. अशाच प्रकारे अनेक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना साथ देण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील पाठिंबापत्र त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे गुरुवारी (दि. 17) सुपूर्द केले.

नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, लोकल चर्च पनवेल प्रोटेस्ट, अखिल भारतीय मातंग संघ पनवेल, मल्टीमीडिया सामाजिक संस्था पनवेल, पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळ, कोकण विकास मंडळ नवीन पनवेल, मराठवाडा बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळ, गणेश टॅक्सी स्टँड खारघर, पनवेल तालुका हिंदू लोहार समाज यांनी आपला पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना दिला असून, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाठिंबापत्र सुपूर्द केले.

या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, संजय भगत, माजी सरपंच गुरुनाथ पाटील, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे, साहेबराव जाधव, गोपाळ रेडकर, हेमंत नेहते, देशमुख, करंगुटकर, पाटील, शांतिवन सोसायटीचे अध्यक्ष भोईर, खजिनदार धामणे, लोकल चर्चचे स्टिफन भिंगारे, सॅम्युअल भिंगारे, जयंत पारधे यांच्यासह सदस्य, मातंग संघाचे जिल्हा अध्यक्ष शंकर कुंडले, पनवेल तालुका अध्यक्ष शांताराम कोळी, इंदिरानगर अध्यक्ष प्रसुराम मातंगी यांच्यासह सदस्य, मल्टीमीडिया सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी दांगट, सचिव चंद्रकांत शिर्के, खजिनदार भूषण साळुंखे यांच्यासह सदस्य, पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. माळी, उपाध्यक्ष व्ही. एस. म्हात्रे यांच्यासह सदस्य, कोकण विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश आयरे, उपाध्यक्ष शेखर सावंत, उपसचिव अनय इरमल, रमेश खाखटकर, जितेंद्र धनावडे, राजेंद्र जाधव, मराठवाडा बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष समाजभूषण उत्तमराव गायकवाड, सरचिटणीस अर्जुनराव गवळी, गणेश टॅक्सी स्टँड खारघरचे शाखाप्रमुख सचिन ठाकूर, पनवेल तालुका हिंदू लोहार समाजाचे अविनाश मोरे, गणेश सोमासे, प्रवीण मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही महापालिकेसंदर्भातील एखादी समस्या असो किंवा सिडकोमधील प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर संबंधित अधिकार्‍यांना सांगून ते सोडवतात. त्यामुळेच आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत आमचा पाठिंबा देत आहोत.

-प्रकाश विचारे, अध्यक्ष, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल

Check Also

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात …

Leave a Reply

Whatsapp