Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / मोहोपाडा शिशु बालमंदिरात बालदिन साजरा

मोहोपाडा शिशु बालमंदिरात बालदिन साजरा

मोहोपाडा : वार्ताहर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळ संचलित शिशुविकास बालमंदिर येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी बालदिनानिमित्त शाळेमध्ये जाऊन मुलांशी खुल्या मनाने संवाद साधला. त्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे, स्वतःची काळजी घेणे, स्वच्छता इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. बालकामगारांना कामावर ठेवू नये, त्यांना शिक्षणापासून वंचित करू नये, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी शिशुविकास बालमंदिरच्या शिक्षिका, महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp