Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / माजी विद्यार्थ्यांनी केला शाळेत बालदिन साजरा

माजी विद्यार्थ्यांनी केला शाळेत बालदिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

बेलपाडा प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. सभापती प्रभाग समिती (अ) व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने रा. जि. प. बेलपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबर,  शार्पनर, स्केच पेन देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह अल्पोपहार करण्यात आला. या वेळी खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, माजी विद्यार्थी युवा नेते रवींद्र काकडे, सतीश बारशे, आदिनाथ पाटील, अविनाश कोळी, शुभम म्हात्रे, संजय जगताप, मुख्याध्यापिका विना मोकल, जालिंदर सर उपस्थित होते.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp