Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी केले अभिनंदन

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी केले अभिनंदन

पनवेल : भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी अभिनंदन केले. या वेळी शरद खारकर उपस्थित होते.

अंकीत घरत यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे युवा नेते अंकीत घरत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत उपस्थित होत्या.

माजी नगरसेविका संगीता कांडपाल यांचा वाढदिवस

पनवेल : माजी नगरसेविका संगीता कांडपाल यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, संगीता महाले, भगवान बडगुजर, अमर अत्तर, इम्रान खान आदी उपस्थित होते.

वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वनिता चोरघे

पनवेल : वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वनिता चोरघे यांची निवड झाली. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी वावंजे जि. प. सदस्य रवींद्र पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, रंजना पाटील, विलास चोरघे आदी उपस्थित होते.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp