Tuesday , August 11 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / टेम्पोची स्वीफ्ट गाडीला धडक; दोन जखमी

टेम्पोची स्वीफ्ट गाडीला धडक; दोन जखमी

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 मार्गावरून जाणार्‍या भरधाव कोंबड्याच्या टेम्पोने त्याच्या पुढे जाणार्‍या स्वीफ्ट गाडीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वीफ्ट गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 वरून कोंबड्यांचा टेम्पो चालला असताना त्याने पुढे चाललेल्या स्वीफ्ट गाडीस पाठीमागून धडक दिल्याने त्या गाडीतील मोहम्मद तमीद मोहम्मद अली हुसेन हा टी-परमिट गाडीचा चालक, तसेच प्रवासी पोलमी आपटे (20) हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

जिम सुरू करण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी देशात जिमला परवानगी देण्यात आली असून राज्यात मात्र जिम सुरू करण्यास अद्याप …

Leave a Reply

Whatsapp